Crime News : देशभरात गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असाच एक फसवणूकीचा प्रकार उजेडात आला आहे. चंदीगड पोलिसांनी शनिवारी शहरातील एका महिलेची तिच्या पतीला एका प्रकरणात सीबीआयने पकडल्याचा दावा करून ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की १५ जानेवारी २०२५ रोजी तिला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला आणि कॉल करणाऱ्याने दावा केला की तिच्या पतीचे आधार कार्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आले आहे.ही खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या बँक खात्यांची माहिती मिळवली आणि त्याच्या मदतीने अनेक अनाधिकृत व्यवहार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेने पोलिसांना सांगितलं की, “आरोपींनी तिचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःची ओळख सीबीआय संचालक आणि आरबीआय संचालक म्हणून करून दिली.”

Man Kills Grandfather Janardhan Rao
धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची नातवाकडून हत्या; मालमत्तेच्या वादातून आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Resignation letter of a junior engineer of the construction department Dharavishiv news
अभियंता आहे, गुलाम नाही! बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
Shinde announces financial aid to Sant Tukaram Maharaj descendant
देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांचं कर्ज…
India alliance
“इंडिया आघाडी अबाधित, पुढच्या लोकसभा निवडणुकीत…”, दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पोलिसांनी सांगितलं की, “फोनवरून दिलेल्या सूचनांचे पालन करत महिलेने तिच्या खात्यामधून मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित केली. मात्र नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने अधिकृत तक्रार दाखल केली”.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की या प्रकरणात चौकशी सुरू असून आरोपींचे बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल क्रमांक यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. महिलेच्या तक्रारीवरून सायबर क्राइम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

यादरम्यान एका निवृत्त लष्करातील अधिकाऱ्याला देखील १० लाखांचा चुना लावणअयात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चंदीगड येथील रहिवासी कर्नल मनजीत सिंग (निवृत्त) यांनी आरोप केला आहे की, चंदीगड येथील सेक्टर ४६/सी येथील आरोपी नीरज भानोत यांने भरगोस परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक फसवणूकीच्या माध्यमातून त्यांची १० लाख रुपयांची फसवणूक केली. प्राथमिक चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader