Kidnap, Rape and Murder of Teen in Kanpur : रमझान काळात प्रेयसी आणि बायकोने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दोन व्यक्तींनी एका १३ वर्षीय मुलावर बलात्कार केला आहे. कानपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ मार्च रोजी पीडित १३ वर्षीय मुलगा जिमला जात होता. त्यावेळी आरोपी अझहर आणि हुसैनी यांनी त्याचं अपहरण केलं. एका कॉल गर्लला भेटायला घेऊन जात असल्याचं या आरोपींनी पीडित मुलाला सांगितलं. पण आरोपीने त्याला जंगलात नेलं. जंगलात त्याला बांधून ठेवलं आणि धमकावले गेले, अशी माहिती डीसीपी विजेंद्र द्विवेदी म्हणाले. जंगलात बांधल्यावर या आरोपींनी पीडित मुलावर बलात्कार केला आणि त्याची दोरीने गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी हुसैनी याला अटक केल असून अझहर अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

५ मार्च रोजी हा मुलगा बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याचं कुटुंबीय त्याला शोधत होतं. तेव्हा त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या हुसैनी कुटुंबाची पोलिसांनी चौकशी केली. या कुटुंबाला कोणाकडून खंडणीचा मेसेज वगैरे आलाय का हे तपासण्याचा सल्ला हुसैनीने दिला. तपास केल्यावर असं कळलं की मुलाच्या काकांच्या मोबाईलवर १० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज आला होता. त्यामुळे पोलिसांना हुसैनीवर संशय बळावला.

असा लागला आरोपीचा शोध

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता पीडित मुलगा बेपत्ता झाला होता, तेव्हा हुसैनीही गायब झाला होता, अशी माहिती समोर आली. परंतु, दुसऱ्या दिवशी तो घरीच होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. त्याच्या जबाबात तफावत आढळल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने पीडित मुलाचं अपहरण केल्याचं मान्य केलं. तसंच, त्याच्या हत्येत सहभागी असल्याचीही कबुली दिली. त्यामुळे हुसैनीला अटक करण्यात आली असून अझहरला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू केल्याची माहिती डीसीपींनी दिली.