जर्मनीच्या मर्सिडीज कार उत्पादन कंपनीने आपल्या नव्या ई-क्लास मधील कार मॉडेल्स भारतीय बाजारात दाखल केल्या आहेत. तसेच २०२० सालापर्यंत भारताचा पहिल्या दहा जागतिक बाजारपेठांमध्ये समावेश होईल अशी कंपनीच्या प्रवक्त्यांनी आशा व्यक्त केली. मर्सिडीजने दाखल केलेल्या ई-क्लास मधील कार किंमत ४१.५१ लाख आणि ४४.४८ लाख आहे इतकी आहे. भारतातील वाढती बाजारपेठ लक्षात घेता लवकरात लवकर नवनविन कार मॉडेल्स बाजारात दाखल करण्यावर उत्पादन कंपन्या भर देत असल्याचेही मर्सिडीज कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
“मर्सिडीज विक्रीमाध्यमात सध्या भारतीय बाजारपेठेचा जागतिक पहिल्या दहा बाजारपेठांमध्ये समावेश नसला तरी, कार विक्रीसाठी पहिल्या दहा बाजारपेठेंमध्ये समावेश होण्याची भारतीय बाजारपेठेची क्षमता आहे. त्यानुसार २०२० पर्यंत भारतीय बाजारपेठे नक्की पहिल्या दहा बाजापेठांमध्ये भारताची नंबर असेल” असे मर्सिडीज बेन्झचे संचालक इर्बेहार्ड  केर्न यांनी स्पष्ट केले आहे   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा