योगगुरू रामदेवबाबा यांचे निकटवर्तीय आणि माजी पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी जमात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याची भेट घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. वैदिक यांनी लाहोरमध्ये सईद याच्या निवासस्थानी त्याची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या भेटीमध्ये सईद याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे वैदिक यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी झालेली निवड, दहशतवाद, जमात उद दवा संघटनेचा अमेरिकेकडून दहशतवादी संघटनांच्या यादीत झालेला समावेश या सर्व विषयांवर सईद याने आपली भूमिका मांडल्याचे वैदिक यांनी सांगितले. आपल्याला भारतात जाहीर सभा घ्यायची आहे. या सभेमध्येच आपण स्वतःची बाजू मांडू, असेही सईदने आपल्या सांगितले आणि भारतात येण्यासाठी निमंत्रण देण्याची विनंतीही केल्याचे त्याने म्हटल्याचे वैदिक यांनी सांगितले.
सईद याची भेट पूर्वनियोजित नव्हती. पाकिस्तानला जाण्यासाठी निघताना मला किंवा केंद्र सरकारला सईद याच्या भेटीबद्दल काहीही माहिती नव्हते. ही भेट अचानकपणे झाल्याचे वैदिक यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकामुळे ही भेट घडून आल्याचे त्यांनी सांगितले.
रामदेवबाबांच्या निकटवर्तीयाने घेतली हाफीज सईदची भेट
योगगुरू रामदेवबाबा यांचे निकटवर्तीय आणि माजी पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी जमात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याची भेट घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
First published on: 14-07-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Met jud chief he wants to visit india ex scribe vaidik