Meta Layoffs Will Affect 3600 Employees Around The World : फेसबुकची पालक कंपनी मेटाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ५% कपात करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. यामुळे युरोप, आशिया आणि अमेरिकेतील ३,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. मेटाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये, म्हटले आहे की, “ही कपात कामगिरीवर आधारित आहे, ज्या कर्मचाऱ्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्यांना कपात करण्यात येणार आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या निर्णयाचा फटका बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कधीच नकारात्मक कामगिरी केलेली नाही. त्यापैकी मेटावर्क्समधील माजी उत्पादन सल्लागार एलाना रेमन सॅफनर आहेत, ज्यांना कंपनीत तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. याबाबत बिझनेस इनसाइडरने वृत्त दिले आहे.

जानेवारीत केली होती कर्मचारी कपातीची घोषणा

जानेवारीमध्ये मेटाने ३६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले होते. आता कंपनीने त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. कंपनी आता काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन लोकांना नियुक्त करण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने म्हटले आहे की, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पाच टक्के कर्मचाऱ्यांवर होईल. सप्टेंबरपर्यंत मेटामध्ये सुमारे ७२,४०० कर्मचारी होते, आता त्यामध्ये मोठी घट होणार आहे.

महिला कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

नोकरीवरून काढल्यानंतर अमेरिकेतील एलाना रेमन सॅफनर यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये मेटावर टीका केली आणि दावा केला की त्यांना काढून टाकण्याचा निर्णय त्यांच्या कामगिरीवर आधारित नव्हता. सहा महिन्यांच्या प्रसूती रजेवरून परतल्यानंतर, काही आठवड्यांनी त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. असा दावा एलाना रेमन सॅफनर यांनी लिंक्डइनवर पोस्टमध्ये केला आहे.

दरम्यान, मेटाने खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे म्हटेल होते. पण, त्यांनी विशेषतः अलिकडच्या काळात रजा घेणाऱ्या लक्ष्य केले आहे. मेटाने रेमन यांना कधीही खराब कामगिरीचे रेटिंग दिले नव्हते, त्यामुळे कंपनीने अचानक त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाने त्यांना धक्का बसला आहे..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta performance based layoffs mark zuckerberg aam