पृथ्वीवर पडण्याचा धोका नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीजवळून सुमारे १०७ उल्का जात असून त्यातील सहा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.

रविवार, चार नोव्हेंबरला ‘अ‍ॅस्टेरॉईड अ‍ॅटेन २०१४ यूव्ही-१’, ‘अ‍ॅटेन २००२ व्हीई-६८’, सहा नोव्हेंबरला ‘अपोलो टीएफ-३’, सात नोव्हेंबरला ‘अ‍ॅटेन २०१० व्हीओ’, नऊ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१५ टीएल-१७५’, १२ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१८ क्यूएन-१’ या उल्का  पृथ्वी जवळून जाणाऱ्या आहेत. या सर्व उल्का ६१ ते १५० फूट व्यासांच्या असून त्या (०.०१० ते ०.०५० खगोलीय एकक) चंद्राच्या कक्षेजवळून लांबून जात आहेत. या उल्का धोकादायक श्रेणीत नाहीत. तरी चंद्र किंवा इतर ग्रहांच्या गुरुत्वामुळे दिशा बदलल्यास धोक्याच्या ठरू शकतात. अवकाशातील बहुतेक उल्का ह्य लघुग्रहांच्या पट्टय़ातच आहेत. त्यात एक किलोमीटर आकाराच्या १९ लाख उल्कांचा समावेश आहे. लहान उल्कांचे प्रमाण आणखी जास्त आहे. पृथ्वीकडे येणाऱ्या अनेक उल्का येथूनच येत असतात. जवळजवळ दहा हजार उल्का पृथ्वीची कक्षा भेदून जात असतात. यातील एक किलोमीटर व्यासाच्या ८६१ उल्का असून त्यातील १४०९ उल्का पृथ्वीला धोक्याच्या श्रेणीत येतात. लघुपट्टय़ातील उल्का या सूर्यमाला तयार झाली, त्याच काळातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात ५० फुटांपासून तर ५०० किलोमीटर व्यासापर्यंतच्या उल्का आहेत. २००८टीसी, २०१४एए, २०१८एलए या धोकादायक उल्कांची आधीच माहिती मिळाली होती. २०१६-१७ वर्षी १३ धोकादायक उल्का पृथ्वीजवळून गेल्या होत्या. महाराष्ट्रातील लोणार येथे मोठी उल्का पडल्याने त्यावेळी मोठा विनाश झाला होता. आजही पृथ्वीवर १५० उल्का पडल्याच्या खुणा विवरांच्या रूपाने पाहायला मिळतात.

नासाची नजर

पेसाडोना, कॅलिफोर्निया येथून नासातर्फे अवकाशातील उल्कांची माहिती घेतली जाते आणि पृथ्वीवर आदळू शकणाऱ्या उल्कांना नष्ट करण्याची तयारी देखील केली जाते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteor nasa