सोशल मीडिया संकेतस्थळावर आज उल्कावर्षांवाविषयी बऱ्याच बातम्या दिसत असून त्यात अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आकाशात प्रकाशाचा मोठा पट्टा दिसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. नासाच्या उल्कापाषाण पर्यावरण कार्यालयाचे बिल कुक यांनी सांगितले की, प्रकाशाचा हा पट्टा म्हणजे एकाच उल्केचे कोसळणे होते असे दिसून येत आहे. प्रकाशाचा गोळा या घटनेत आग्नेयेकडे गेल्याचे दिसले. एकूण ३५० जणांनी ती उल्का असल्याचे अमेरिकन मीटिऑर सोसायटीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. फिलाडेल्फियाच्या फ्रँकलिन इन्स्टिटय़ूटचे मुख्य खगोलवैज्ञानिक डेरिक पीटस यांनी सांगितले की, यात अग्निगोल दिसून आले आहेत. पीटस यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी ही घटना झाल्याने त्याकडे जास्त लक्ष वेधले गेले कारण ट्विटरवरून ही माहिती लोकांनीच मोठय़ा प्रमाणात दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteoric showers in america also