चांदोबा, चांदोमामा, चंद्रमा.. अशा अनेक नावांनी पृथ्वीचा उपग्रह चंद्र ओळखला जातो. पृथ्वीवरील प्रत्येकालाच चंद्र प्रिय आहे. चंद्रावर काव्य नाही, अशी भाषाच नसेल. अनेक चित्रपटांतील प्रेमगीतांमध्ये चंद्रम्याचा उल्लेख येतोच.. मात्र चंद्राची निर्मिती कधी झाली आहे माहीत आहे..? तब्बल ४४७ कोटी वर्षांपूर्वी. अमेरिकी शास्त्रज्ञांच्या एका चमूने याबाबत संशोधन करून चंद्राची निर्मिती कधी व कशी झाली, याची माहिती दिली.
पृथ्वीची आणि एका धूमकेतूची राक्षसी धडक झाली आणि या धडकेत पृथ्वीचा एक भाग वेगळा झाला आणि पृथ्वीभोवती फिरू लागला. हाच पुढे चंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र ही घटना कधी घडली याबाबत शास्त्रज्ञांना संभ्रम होता. त्यासाठी त्यांनी चंद्रावर अवकाशयान पाठविले होते. या अवकाशयानाने पाठविलेली छायाचित्रे आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुन्यांचा अभ्यास केला आणि त्यावरून चंद्राचे वय काढले.
या शास्त्रज्ञांनी चंद्रावरील मातीचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला. चंद्रावरील अनेक किलोमीटर अंतरावरील अंशाचाही अभ्यास केला असून, त्याद्वारे हे वयोमान काढले आहे.
सौरमाला आणि त्यातील ग्रहांची निर्मिती चंद्रनिर्मितीपूर्वी १० कोटी वर्षांपूर्वी झाली आहे, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले. नासाच्या सौरमाला संशोधन केंद्राच्या प्रा. बिल बॉट्क यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा