दिल्लीमध्ये एका मेट्रोत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना आज मंगळवार सकाळी आपल्या निर्धारित वेळेत पोहोचता आले नाही. जहांगिरपूर ते हुडा सिटी सेंटर दरम्यान जाणारी मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो जागीच थांबली. त्यामुळे इतर मेट्रोंच्या वाहतूकीवरही याचा परिणाम झाला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास यलो मेट्रो लाईनवर ही घटना घडली. उद्योगभवन स्थानकाजवळ ही मेट्रो बंद पडली होती. या घटनेमुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. पण, त्यानंतर काही वेळाने ती पूर्ववक करण्यात आली. 

Story img Loader