मेक्सिकोतील प्लाया नाईट क्लबमध्ये एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. एका अज्ञात व्यक्तीने अचानक अंदाधुंद गोळीबार केलेल्यामुळे प्लाया नाईट क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला होता. अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोक सैरवर धावत होते.

ही घटना मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यात असलेल्या नाईट क्लबमध्ये घडली. परिसरात पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती जुआन जोस मार्टिने यांनी दिली आहे.

प्रथमिक माहितीनुसार, येथील पेट्रोले मॅक्सोसोस (PEMEX) या इंधन कंपनीमध्ये गेल्या वर्षभरात ३ बिलियन अमेरिकन डॉलरच्या इंधनाची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी इंधन चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात एक मोहित उघडली असून घरपकड सुरू आहे. यामधील आरोपीनेच शनिवारी रात्री नाईटक्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार केला असावा. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Story img Loader