न्यूयॉर्क : रशिया-युक्रेन युद्धावर कायमचा तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी समिती नेमावी आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरेस यांचा समावेश करावा, असा प्रस्ताव मॅक्सिकोने दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युद्ध थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मॅक्सिकोने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेन युद्धावर चर्चा झाली. यावेळी मॅक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो लुईस एबरार्ड कासाबॉन यांनी आपल्या अध्यक्षांच्या वतीनं मध्यस्थ समितीचा प्रस्ताव मांडला. गुटेरेस यांनी समितीसाठी पुढाकार घ्यावा आणि त्यात शक्य झाल्यास पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांचा समावेश करावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी संयुक्त राष्ट्रांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले.

तेलपुरवठा थांबवण्याचा रशियाचा इशारा

जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल तर जागतिक बाजाराला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याचा इशारा रशियाने शुक्रवारी दिला. तेलाच्या किमती अयोग्य आहेत, असे आम्हाला वाटले तर आम्ही जागतिक बाजारपेठेचा आणि किंमत मर्यादेबाबत अमेरिकेला पािठबा देणाऱ्या देशांचाही तेलपुरवठा थांबवू, असा इशारा रशियाचे राजदूर डेनिस अलिपोव्ह यांनी भारताला दिला आहे.

रशिया आपल्या व्यापारहितासाठी कोणत्याही हानीकारक यंत्रणेचे पालन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या र्निबधांमुळे रशियावर फारसा प्रभाव पडत नसल्याने जी-७ देश आणि युरोपिय महासंघाने रशियाच्या उत्पन्नावर मर्यादा घालण्यासाठी रशियन क्रूड आणि रिफाइंड तेल उत्पादनांवर किमतीची मर्यादा आणली आहे. त्या पाश्र्वभूमीवर रशियाने तेलपुरवठा थांबवण्याचा इशारा दिला आहे.