केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA)त्यांच्या विदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या (FCRA) वेबसाइटवरून महत्त्वपूर्ण माहिती काढून टाकली आहे. यामध्ये ज्या एनजीओचे परवाने रद्द केले गेले आहेत, त्या एनजीओची यादी, तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या माहितीचा समावेश आहे.
विदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या (FCRA) अधिकृत वेबसाईटवर FCRA परवाना धारकांची माहिती दिली जाते. तसेच ज्या एनजीओचे परवाने रद्द झाले आहे, अशा एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची माहिती देखील या साईटवर दिली जाते. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एनजीओची यादी वेसाईटवरून काढून टाकल्याने एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची कोणीतीही माहिती उपलब्ध नाही.
यासंदर्भात बोलताना, ”जी माहिती उपयुक्त नव्हती ती माहिती वेबसाईटवरून काढून टाकण्यात आली आहे”,असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, १ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून FCRAच्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये FCRAच्या नियम १३ चाही समावेश होता. याच नियमानुसार एनजीओंना आर्थिक व्यवहाराची माहिती देणे बंधकारक असते.