मजूर पक्षाचे निवडणूक प्रमुख व परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते डग्लस अलेक्झांडर यांच्यासारख्या दिग्गजाला मेरी ब्लॅक हिने पराभवाची धूळ चारली. तब्बल ३०० वर्षांनंतर ब्रिटनची सर्वात तरुण संसदपटू होण्याचा मान या २० वर्षीय तरुणीने मिळविला. डग्लस यांचा ५,६८४ मतांनी पराभव केला.
ब्रिटिश संसद निवडणुकीत अनेक भारतीय विजयी
मेरी ही स्कॉटिश नॅशनल पक्षाची असून पैस्ले आणि दक्षिण रेनफ्रेवशायरमधून निवडणुकीला उभी राहिली होती. १६६७ मध्ये १३ वर्षीय ख्रिस्तोफर माँकटोन याने हा पराक्रम केला होता. ती ग्लासगो विद्यापीठात राजकारणशास्त्र विषयाच्या शेवटच्या वर्षांतील शिक्षण पूर्ण करूनच सभागृहात जाणार आहे. मेरीला एकूण १६,६१४ मते मिळाली.
 स्कॉटिश नॅशनल पक्षाने स्कॉटलंडमधील ५९ जागांपैकी ५६ जागा जिंकल्या असून प्रथमच एवढे यश मिळविले आहे.   मेरीच्या विजयानंतर स्कॉटिश नॅशनल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आता स्कॉटलंडचा आवाज संसदेत पोहोचणार, असे स्कॉटलंडची जनता बोलत असल्याचे मेरीने या धक्कादायक विजयानंतर बोलताना सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा