Mia Khalifa Israel-Palestine Conflict : अभिनेत्री आणि मॉडेल मिया खलिफाने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर तिची मतं मांडली आहेत. तसंच हमास दहशतवाद्यांवरही तिने भाष्य केलं आहे. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार असलेल्या मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या बाजूने ट्विट केलं आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाईनमधल्या लहान मुलं, वृद्ध लोक आणि महिलांवर सतत अत्याचार करत आहे आणि त्यांना लक्ष्य करत आहे असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पण वाचा- “सगळ्यांना ठार केलं आणि शेवटी मी….”, इस्रायली नागरिकाने बहिणीबाबत लिहिलेली पोस्ट वाचून डोळ्यात येतील अश्रू!

मियाने एकाहून जास्त X (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मियाने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ती खूप संतापलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये मिया खलिफा पॅलेस्टाईनमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सांगत आहे. त्यांच्यात राहणार्‍या लोकसंख्येपैकी ४२ टक्के मुले ही १५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची आहेत, असे तिने सांगितले.

एवढंच नाही तर या प्रश्नावरुन कायली जेनर आणि मिया खलिफा यांच्यातही X वर जुंपल्याचं पाहण्यास मिळतं आहे. कायली जेनरने इस्रायलला पाठिंबा देणारी एक पोस्ट केली होती. जी नंतर तिने डिलिट केली. मात्र त्या पोस्टचा स्क्रिन शॉट शेअर करत आपल्या खास शैलीत मिया खलिफाने तिच्यावर टीका केली आहे. मी आत्ता आणि यापुढे कायमच इस्रायलच्या लोकांबरोबर आहे या आशयाची X पोस्ट कायलीने केली होती. त्यावर मिया खलिफाने तिची शाळा घेतली आहे. याला काय खरीखुरी पत्रकारिता म्हणतात का? कायली जेनरला जर तिचं या संघर्षाबद्दलचं मत कुणी विचारलं आणि तिने त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं तर तिला मानलं असं म्हणत मियाने तिच्यावर टीका केली आहे. तसंच फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी असले उद्योग करु नकोस असंही मिया खलिफाने तिला सुनावलं आहे.

दुसरीकडे मिया खलिफाने आणखी एक X पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते की मी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने माझ्या व्यवसायाच्या अनेक संधी जातील हे मला माहित आहे या आशयाचं एक वाक्य लिहिलं आहे. त्यावरुन तिलाही लोक उलटसुलट गोष्टी ऐकवत आहेत.

मियाने पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी X पोस्ट केल्यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे. जेव्हा हमासचे दहशतवादी निरपराध लोकांवर अत्याचार करत होते तेव्हा तुझ्यातील माणुसकीचे हे शब्द कुठे होते? असा सवाल यूजर्स तिला करत आहेत. त्याचवेळी मियाला असेही विचारले जात आहे की, या विषयावर तिचे मत खरेच महत्त्वाचे आहे का?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mia khalifa trends over palestine posts snide remarks at kylie jenner scj