एक्सप्रेस वृत्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली : भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये चीन कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय मायक्रोसॉफ्टकडून व्यक्त करण्यात आला. मायक्रोसॉफ्टच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, जगातील महत्त्वाच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असेल.

‘सेम टार्गेट्स, न्यू प्लेबुक्स : इस्ट एशिया थ्रेट ॲक्टर्स एम्प्लॉय युनिक मेथड्स’ हा अहवाल ‘मायक्रोसॉफ्ट थ्रेट ॲनालिसिस सेंटर’कडून (एमटीएसी) शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, चीन ‘एआय’द्वारे निर्मित आशयाचा वापर करून भारतातील लोकसभा निवडणूक, अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक आणि दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल असेंब्ली’ची निवडणूक यावर प्रभाव टाकून त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करेल. चीन कमीत कमी आपल्या भूमिकेला फायदा होईल अशा प्रकारे ‘एआय’-निर्मित आशय तयार करून तो समाजमाध्यमांद्वारे पसरवेल असा इशारा त्यामध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

अशा प्रकारच्या आशयाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, तरीही मीम, ध्वनिचित्रफिती आणि ध्वनिफिती यात अधिकाधिक प्रयोग केले जातील असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, हळुहळू या प्रयोगांची परिणामकारकता वाढण्याचा धोका आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft has expressed its suspicion that china is trying to interfere in the lok sabha elections in india by using artificial intelligence ai