सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतात जन्मलेले सत्या नाडेला यांची निवड करण्यात आली. ते स्टीव्ह बॉलमर यांची जागा घेणार आहेत. जगातील प्रतिष्ठित कंपनी समजल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदाच्या या शर्यतीत नाडेला यांच्यासोबत गुगल क्रोम व अ‍ॅपचे प्रमुख सुंदर पिचाई (४२) यांचे नावही घेतले जात होते. मात्र, गेल्या तीन चार महिन्यांपासून या पदासाठी चर्चेत असलेल्या नाडेला यांनीच अखेर बाजी मारली.
नाडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासातील केवळ तिसरे सीईओ आहेत. याआधी कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि बॉलमर यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. बिल गेट्स हे आता तंत्रज्ञान सल्लागार म्हणून काम करणार असून जास्तीत जास्त वेळ कंपनीची उत्पादने व तंत्रज्ञान यांना दिशा देणार आहेत.
मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी अभिनव कल्पनांच्या माध्यमातून बरेच काम केले आहे. उद्योग भागीदारीतही त्यांचे प्रावीण्य मोठे आहे. नाडेला ४६ वर्षांचे असून मायक्रोसॉफ्टचा जास्त वेगाने विकास होत असताना ते आता सूत्रे हाती घेत आहेत.

कोण आहेत नाडेला?
सत्या नाडेला यांचा जन्म १९६९ मध्ये हैदराबाद येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण तेथेच हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. मणिपाल तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व संदेशवहन अभियांत्रिकीत पदवी घेतली व नंतरचे अभियांत्रिकी शिक्षण परदेशात घेतले. विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्यांनी संगणक विज्ञानात स्नातकोत्तर पदवी घेतली. शिकागो विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. १९९२ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आले. तेथे ते विंडोज डेव्हलपमेंट रिलेशन्स ग्रुपमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर झाले. नंतर ते वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन व विकास) या पदावर आले. सध्या ते मायक्रोसॉफ्ट वर्ड व क्लाऊड अँड एंटरप्राइजेसचे कार्यकारी उपाध्यक्ष बनले. क्लाउड विभागात त्यांनी केलेले काम पाहून त्यांना ‘क्लाऊड गाय’ असेही म्हटले जाते.

या स्थित्यंतराच्या घडीला सत्या नाडेला यांच्यासारखा चांगला नेतृत्व गुण व तंत्र-उद्योगकुशल माणूस आम्हाला दुसरा दिसला नाही. नाडेला यांनी त्यांच्या क्षमता सिद्ध केलेल्या असून त्यांची उद्योग दूरदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्ये यातून ते लोकांना एकत्र आणतील. तंत्रज्ञान कसे वापरायचे याबाबत त्यांची दृष्टी वेगळी आहे व मायक्रोसॉफ्ट नवीन उत्पादनांकडे वळत असताना तेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योग्य आहेत.
– बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे माजी अध्यक्ष

प्रयोगशील, तंत्रकुशल
मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी निवड झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या मार्गात येणारे अडथळे ‘निष्ठूरपणे’ हटवण्याचे जाहीर केले आहे. अभिनव कल्पना आणि प्रयोगशीलता या गुणांबद्दल प्रसिद्ध असलेल्या नाडेला यांनी या विधानातूनच भविष्यातील वाटचालीची दिशा दाखवली आहे.
सत्या नाडेला यांचा जन्म १९६९ मध्ये हैदराबाद येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण तेथेच हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. मणिपाल तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी इलेक्ट्रॉनिक व संदेशवहन अभियांत्रिकीत पदवी घेतली व नंतरचे अभियांत्रिकी शिक्षण परदेशात घेतले. विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्यांनी संगणक विज्ञानात स्नातकोत्तर पदवी घेतली. शिकागो विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. सन मायक्रोसिस्टीम्स या कंपनीत त्यांनी कारकीर्द सुरू केली व १९९२ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आले. तेथे ते विंडोज डेव्हलपमेंट रिलेशन्स ग्रुपमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर झाले. नंतर ते वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन व विकास) या पदावर आले. मायक्रोसॉफ्ट बिझीनेस सोल्यूशन्स ग्रुपचे ते उपाध्यक्ष बनले. मायक्रोसॉफ्ट सव्‍‌र्हर अँड टूल्स बिझिनेसचे अध्यक्ष बनले. त्यांची कारकीर्द ही अशी बहरत गेली. सध्या ते मायक्रोसॉफ्ट वर्ड व क्लाऊड अँड एंटरप्राइजेस या समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष बनले. क्लाउड विभागात त्यांनी केलेले काम पाहून त्यांना ‘क्लाऊड गाय’ असेही म्हटले जाते.

‘सीईओ’पदाचे स्पर्धक
’अ‍ॅलन मुलाली, सीईओ-फोर्ड मोटर्स
’सुंदर पिचाई- गुगल क्रोम
व अ‍ॅप्सचे प्रमुख
’सत्या नाडेला- मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष

नाडेलांची बलस्थाने
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व खाचाखोचांची माहिती.
विकास व महसूल वाढवण्यासाठी नवीन उत्पादने तयार करण्याची दूरदृष्टी
क्लाऊड कॉम्प्युटिंग, तंत्रकुशल नेतृत्व
नोकिया विकत घेतल्यानंतर पूरक उत्पादने तयार करण्याची क्षमता

कमजोर बाजू
बिंग सर्च इंजिनबाबत
फार प्रगती नाही.
गुगल सर्चला स्पर्धा
देण्यात अपयश
अ‍ॅमेझॉनने ऑनलाइन क्लाऊड कॉम्प्युटिंग मायक्रोसॉफ्टच्या आधी दिले.

नाडेला यांची वैशिष्टय़े : 
नाडेला यांच्याकडे मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे, शिवाय तंत्रकुशलता व नेतृत्वक्षमता या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. त्यांनी क्लाऊड विभागात (जिथे माहिती परस्पर साठवली जाते; तुमच्या संगणकावर लोड येत नाही अशी व्यवस्था)जे काम केले त्याचे फळ त्यांना या निवडीतून मिळाले. नोकिया कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली असून आता मायक्रोसॉफ्टपुढे त्याला पूरक अशी उत्पादने देण्याचे आव्हान आहे. हेच आव्हान आता नाडेला यांना पेलायचे आहे.

Story img Loader