सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतात जन्मलेल्या सत्या नाडेला यांची निवड झाली. त्याचबरोबर या प्रतिष्ठीत कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीही पुढील पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने आपले अधिकार सोडण्याचा निर्णय घेतला. गेली चार दशके सॉफ्टवेअर क्षेत्रात अविरत कामगिरी करणाऱया मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या आठवणींना दिलेला उजाळा..
* १९७५ – १९ वर्षीय बिल गेट्स यांनी हावर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या पौल अॅलेन या लहानपणीच्या मित्रासोबत सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांच्या कल्पनेतून साकार झाला अल्टेअर ८८०० मायक्रोकॉप्यूटरसाठीचा प्राथमिक तत्वावरील ‘सॉफ्टवेअर प्रोग्राम’
* १९७९- सॉफ्टवेअर क्षेत्रात १९७८च्या अखेरीपर्यंत विक्रीदर १ कोटींच्या घरात पोहोचल्यावर मायक्रोसॉफ्टने आपले मुख्य कार्यालय वॉशिंग्टनमध्ये सुरू करण्याचे ठरविले.
* १९८०- जून महिन्यात, बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टसाठी हावर्ड विद्यापीठातील त्यांचा वर्गमित्र स्टिव्ह बॉलमर यांचा व्यवसाय व्यवस्थापक पदावर निवड केली.
* १९८१- ऑगस्टमध्ये, या कंपनीने मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटींग सिस्टम(एमएस-डॉस) संकल्पना सॉफ्टवेअर क्षेत्रात आणली. याचा वापर ‘आयबीएम’च्या कॉम्प्यूटर्समध्ये केला गेला.
* १९८३- ‘एमएसडॉस’मध्ये आणखी नवे बदल करून ‘विंडोज’ संकल्पना सॉफ्टवेअर क्षेत्राला दिली.
* १९८५ – ‘विंडोज’ प्रणालीवर दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर मायक्रोसॉफ्टने ‘विंडोज १.०’ प्रणाली विकसीत केली. यातून सॉफ्टवेअर क्षेत्रात पहिल्यांदा ‘माऊस’चा वापर करून ‘मॉनिटर’वरील इच्छित ‘फोल्डर्स’वर क्लिक करता आले
* १९८६ – मायक्रोसॉफ्टने आपल्या आर्थिक कमाईत उल्लेखनिय प्रगती करत ६० कोटी यूएस डॉलर्सचा आकडा गाठला.
* १९८८ – याकाळात विंडोजमध्ये आणखी प्रगती करत विंडोज २.० दाखल झाला. याच काळात मायक्रोसॉफ्ट कंपनी कॉम्प्यूटर्ससाठी सॉफ्टवेअर निर्माण करणारी जगातील सर्वात आघाडीवरील कंपनी बनली.
* १९९०-९५: मायक्रोसॉफ्टने १९९० मध्ये विंडोज ३.० सॉफ्टवेअर विकसीत केले आणि त्यानंतर केवळ पाचवर्षांनंतर ‘विंडोज ९५’ सॉफ्टवेअर दाखल झाला.
* १९९५ नंतर- सॉफ्टवेअर क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत मायक्रोसॉफ्टने आपला स्वत:चा ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ नावाचा इंटरनेट सर्च निर्माण केला.