शिक्षकांनी स्वत: माध्यान्ह भोजनाची चाचणी करून नंतर ते विद्यार्थ्यांना द्यावे, असा नियम आहे. मात्र, मध्यप्रदेश, जबलपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी अजब शोध लावला आहे. स्वत: प्रयोगासाठी वापरली जाणारी व्यक्ती न होता कुत्र्यांवर माध्यान्ह भोजनाची चाचणी केली जाणार आहे.
राज्य अध्यापक संघ या स्थानिक शिक्षक संघटनेच्या वतीने सदस्य शिक्षकांना माध्यान्ह भोजनाची चाचणी मोकाट कुत्र्यांवर करण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. कुत्र्यांना जेवण खायला घालून २० मिनिटे काय परिणाम होतो, त्याचे निरीक्षण करावे. त्यानंतर स्वत: अन्न खाऊन पाहावे आणि नंतर विद्यार्थ्यांना द्यावे अशी सूचना करण्यात आली आहे.
बिहारच्या शाळेतील विषबाधेमुळे २३ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सरकारने शिक्षकांना माध्यान्ह भोजनाची स्वत: चाचणी करून मगच विद्यार्थ्यांना देण्याची सक्ती केली आहे.
“शिक्षकांवर प्रयोग करण्यात कोणते शहाणपण आहे? भोजन बनवणाऱ्या स्वयंम् सहाय्यता गटांवरच ही जबाबदारी का सोपवली जात नाही? लोकांमधून प्रतिनिधी का नेमले जात नाहीत? माध्यान्ह भोजनाच्या चाचणीच्या प्रयोगासाठी शिक्षकांनी स्वत:चा वापर न करता शाळेच्या आवारामध्ये योणाऱ्या मोकाट कुत्र्यांवर हा प्रयोग करावा”, असा उल्लेख संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एक पानी पत्रकामध्ये केला असल्याचे संघटनेचे जबलपूर अध्यक्ष नरेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.
आम्हाला मुलांची काळजी आहे मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्हाला प्रयोगासाठी वापरले जावे. असे त्रिपाठी म्हणाले.
माध्यान्ह भोजनाची चाचणी मध्य प्रदेशात कुत्र्यांवर
शिक्षकांनी स्वत: माध्यान्ह भोजनाची चाचणी करून नंतर ते विद्यार्थ्यांना द्यावे, असा नियम आहे. मात्र, मध्यप्रदेश, जबलपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी अजब शोध लावला..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mid day meals in madhya pradesh meal tasting order goes to dogs