एपी, जेरुसलेम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायल आणि हेजबोलामध्ये युद्धविराम होऊन काही दिवस होत नाहीत, तोच लेबनॉनमध्ये सर्वदूर इस्रायलच्या विमानांनी हल्ले केले. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. इस्रायलनेच शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हेजबोलाने इस्रायलच्या दिशेने हल्ले केले होते. त्याला इस्रायलने हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा >>> चकमकीत ‘लष्कर’चा दहशतवादी ठार

इस्रायल आणि हेजबोला यांच्यामध्ये गेल्या बुधवारी ६० दिवसांचा शस्त्रसंधी करार झाला. वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्ष संपेल, अशी आशा असताना आठवड्यातच शस्त्रसंधीला सुरुंग लागला आहे. शस्त्रसंधी कराराचे जगभरातून स्वागत झाले होते. लेबनॉनमधील हजारो नागरिक त्यांच्या घरी परतले होते. मात्र, त्यांच्या संघर्षविरामाच्या आशा प्रत्यक्षात कायम राहतात का, हे येत्या काळातच समजेल. दरम्यान, या कराराचे उल्लंघन झाल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा इस्रायलने करारावेळी दिला होता.

दरम्यान, अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या अपहृत नागरिकांची पॅलेस्टिनींनी तत्काळ सुटका करावी, असे हमासला बजावले आहे. तसे न झाल्यास, मोठी किंमत मोजावी लागेल, असा धमकीवजा इशाराही पॅलेस्टिनींना दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Middle east latest deadly strikes by israel in lebanon zws