भारतीय हवाई दलाचे आणखी एक मिग-२१ विमान शुक्रवारी राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात कोसळले. विमान कोसळणार असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारल्याने त्याचे प्राण बचावले. 
बारमेर जिल्ह्यातील सोदियार गावाजवळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली. उत्तरलाय विमानतळावरून वैमानिक नैमित्तिक सरावसाठी हे विमान घेऊन गेला होता. बारमेरपासून ४० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानात बिघाड झाल्याने ते कोसळले. हवाई दलाचे प्रवक्ते एस. डी. गोस्वामी यांनी याबाबत माहिती दिली. विमान कोसळल्याचे लक्षात येताच बचावकार्यासाठी जोधपूरमधून पथक रवाना झाले.

Story img Loader