Mig 29 Fighter Jet Crashes : भारतीय हवाई दलाचे (IAF) मिग-२९ हे लढाऊ विमान सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. मिग-२९ जेट पायलटला अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. बारमेर सेक्टरमधील हवाई दलाच्या तळावरून प्रशिक्षण मोहिमेवर असलेले हे लढाऊ विमान बारमेरमधील उत्तरलाईजवळील एका शेतात कोसळल्यानंतर तत्काळ आग लागली. सुदैवाने यात पायलट व्यतिरिक्त कोणीही नव्हते.

“बारमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग-२९ मध्ये एक गंभीर तांत्रिक अडचण आली, यामुळे पायलटला बाहेर काढण्यास भाग पाडले. पायलट सुरक्षित आहे आणि कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही”, असे हवाई दलाने स्पष्ट केले आहे. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, असे हवाई दलाने म्हटले आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी

बारमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीना आणि इतर जिल्हा प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

जून महिन्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका शेतात सुखोई लढाऊ विमान कोसळले होते. यावेळीही वैमानिक आणि सहवैमानिक वेळेत बाहेर पडल्याने ते बचावले.

Story img Loader