Crime News : हैदराबाद येथे एका ७५ वर्षीय महिलेची एका स्थलांतरित कामगाराने तिच्या घरात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर या हत्येनंतर हा आरोपीने स्वतःचा महिलेच्या मृतदेहावर उड्या मारतानाचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला असे मंगळवारी पोलिसांनी सांगितले.

कुशाईगुडा येथे ११ एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. या किशोरवयीन आरोपीने हा व्हिडीओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर सोमवारी या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांना कळवण्यात आले असेही पोलिसांनी सांगितले.

हत्या झालेल्या महिलेच्या एका दुकानात हा आरोपी काम करत होता. पोलिसांनी सांगितले की, लोखंडी रॉडने वार करून महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यावर आरोपी तेवढ्यावरच शांत बसला नाही, त्याने साडी महिलेच्या गळ्याभोवती गुंडाळली आणि तिली पंख्याला लटकावले. त्यानंतर त्याने स्वत:चा सत्तरीत असलेल्या महिलेच्या शरीरावर उडी मारतानाचा व्हिडिओ त्याच्या फोनमध्ये रेकॉर्ड केला, असेही एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

सोमवारी या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलीस या महिलेच्या घरी पोहचले आणि त्यांनी घराचे कुलूप तोडून आत गेले, यावेळी त्यांना महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

राजस्थानच्या रहिवासी असलेल्या महिलेने त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असल्याने त्या किशोरवयीन मुलाचा त्याच्यावर राग होता असे दिसते. तथापि, पोलिसांनी सांगितले की ते सर्व बाजूंनी पडताळणी करत आहेत.

राजस्थानचा रहिवासी असलेल्या या आरोपी किशोरवयीन मुलाच्या मनात त्याला शिवीगाळ केल्याने या महिलेबद्दल राग होता असे दिसून येते. असे असले तरी सर्व बाजू तपासल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा किशोरवयीन आरोपी अल्पवयीन आहे का याबद्दल तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्याच्या मानसिक स्थिती देखील तपासली जात आहे.