रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या आता १४ लाख ५० हजारांवर पोहचली असल्याचे स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे.
युक्रेनमधून निर्गमन केलेले लोक ज्या देशांमध्ये पोहचले, त्या देशांतील सरकारच्या मंत्रालयांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे संयुक्त राष्ट्र स्थलांतर संस्थेने (यूएन मायग्रेशन एजन्सी- आयओएम) ही संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार, ७,८७,३०० लोक पोलंडमध्ये गेले आहेत. सुमारे २.२८,७०० लोक मोल्दोवात, १,४४,७०० लोक हंगेरीमध्ये, १,३२,६०० लोक रुमानियात, तर १,००,५०० लोक स्लोव्हाकियात पोहचले आहेत.
१३८ देशांचे नागरिक युक्रेनच्या सीमा ओलांडून शेजारी देशांमध्ये गेले असल्याचे आयओएमने सांगितले आहे.