Viral Video : प्रवास करताना बरेच जण रात्री अपरात्री कॅब बुक करतात. पण जर रात्रीच्या प्रवासादरम्यान तुमचा ड्रायव्हर झोपी गेली तर? असाच मजेशीर अनुभव बंगळुरू येथील एका तरुणाने शेअर केला आहे. आयआयएम ग्रॅज्युएट आणि कॅम्प डायरीज बेंगळुरूचे संस्थापक मिलिंद चंदवानी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर एक मजेशीर प्रसंग शेअर केला आहे, ज की सध्या व्हायरल होत आहे. इंस्टग्रामवर केलेले एका व्हिडिओ पोस्टमध्ये त्यांनी बंगळुरू विमानतळावरून पहाटे ३ वाजता घरी परतताना कॅब प्रवासादरम्यान घडलेली घटना सांगितली आहे.
आपला अनोखा अनुभव सांगताना पोस्टमध्ये सांगितले की त्यांनी पहाटे विमानतळावरून कॅब बुक केली. मात्र त्यांनी बुक केलेल्या कॅबच्या चालकाला झोप येत होती. झोप खालवण्यासाठी त्याने थांबून चहा- सिगारेट देखील घेतली, मात्र काही फायदा झाला नाही.
अखेर मिलिंद यांनी चालकाला मी गाडी चालवू का? असं विचारलं तर त्याने तात्काळ होकार दिला. मग चालक पॅसेंजर सीटवर बसला आणि झोपी गेला. मिलिंद यांना गाडी चालवत गूगल मॅपच्या मदतीने आपला प्रवास पूर्ण केला.
पोहचल्यावर ड्रायव्हरच्या बॉसचा फोन आला आणि ड्रायव्हरने त्यांना सांगितली की, आता मी यापुढे रात्रीची शिफ्ट करू शकत नाही, इतकंच नाही तर त्याने मालकाकडे दिवसाची शिफ्ट देखील मागितली, हे देखील मला ऐकू आलं असेही मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा>> प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
“जीवन अनपेक्षित वळणाने भरलेले आहे. दयाळू बना, सहानुभूती बाळगा आणि कदाचित तुमच्या ड्रायव्हिंग स्किलवर थोडी मेहनत घ्या. सर्वात महत्त्वाचे या कथेचा बोध काय? तर जेव्हा तुम्ही काही ऑफर करता तेव्हा समोरच्या व्यक्तीने तुमची ऑफर स्वीकारली तर त्यासाठी तयार राहा”, असेही मिलिंद यांनी म्हटले आहे.
मिलिंद यांची पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले असून त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला एका दिवसात सुमारे ११ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी मिलिंद यांच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहे. अनेकांनी त्यांच्याबरोबर घडलेले असेच काही मजेशीर किस्से देखील कमेंटमध्ये शेअर केले आहेत.