काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवरा यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो. देवरांच्या राजीनाम्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’ अकाउंटवर एक ट्वीट करत दिवंगत नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “मुरली देवरा यांच्याबरोबरचे दिवस मला आठवतात. मुरली देवरा यांचे सर्वच पक्षांमध्ये मित्र होते. पण, ते नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. तथास्तु!”, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!

हेही वाचा : ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

मिलिंद देवरा काय म्हणाले?

‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत मिलिंद देवरांनी म्हटलं, “आज माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचे पक्षाशी ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे. सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबाबत मी त्यांचे आभारी मानतो.”

हेही वाचा : मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप-शिंदे गटात संघर्ष?

मिलिंद देवरा यांनी लोकसभेत दोनवेळा दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. अशातच मिलिंद देवरा पुन्हा दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पण, दक्षिण मुंबई मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा सांगितलं आहे. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार नसल्याचं नक्की झालं होतं. त्यामुळे देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.