जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक अज्ञात बंदुकधारी ठार झाल्याचे, पोलिसांनी आज (शनिवार) सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या झैनापुरा भागात पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सचे जवान शोधमोहिम करत असताना त्यांच्यावर करण्यात गोळीबार आला. या गोळीबाराला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक अज्ञात बंदुकधारी ठार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर जवानांनी परिसरात नाकेबंदी केली. मृत पावलेल्या बंदुकधा-याबद्दलची माहिती अद्याप कळू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतरच शोधमोहिम करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले.

Story img Loader