जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात त्राल येथे लष्कराशी झालेल्या चकमकीत मारला गेला. यात एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले व मृत अतिरेक्याचा मृतदेह ताब्यात मिळावा यासाठी स्थानिक लोकांनी निदर्शने केली. निदर्शकांनी दोन पोलीस बंकर पेटवून दिले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अश्रुधुराचा माराही करण्यात आला.
लष्करी प्रवक्तयाने सांगितले की, अरीपाल खेडय़ात तपासणी चालू असताना ही चकमक झाली. तेथे अतिरेकी लपल्याची माहिती आधीच मिळाली होती, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा