पाकिस्तानातील अराजकता असलेल्या खबर प्रांतात सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यात तीन तालिबानविरोधी नागरी सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आला, तर अन्य चार सैनिकांचे अपहरण करण्यात आल़े अशी माहिती अधिकृत सूत्रांनी
दिली़
येथील बारा भागात ‘शालोबार शांतता समिती’च्या कार्यालयात मंगळवारी सुमारे बारा सशस्त्र अतिरेकी घुसल़े त्या वेळी सैनिक झोपलेले होत़े त्यामुळे त्यांना अतिरेक्यांच्या आकस्मिक हल्ल्याला प्रत्युत्तर देता आले नाही़ तरीही त्या पैकी काहींनी अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार केला़ परंतु तरीही अतिरेक्यांना तिघांचे शिरकाण आणि चौघांचे अपहरण करण्यापासून ते रोखू शकले नाहीत़ अतिरेकी तिघांची मस्तके आपल्यासोबत घेऊन गेले आणि त्यांनी ती रस्त्यात भिरकावून दिली़ आणि मंगळवारी दुपारी १२ पर्यंत ती रस्त्यातून उचलू नयेत, असे स्थानिकांना बजावण्यात आल़े शिरकाण करण्यात आलेले दोन कलेवर कुमाबराबाद येथे सापडल़े तिसऱ्या मृतदेहाबाबत मात्र स्थानिक माध्यमांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही़ हे तिघे नुकतेच स्वयंसेवक म्हणून शांतता समितीत रुजू झाले होत़े कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
‘शालोबार शांतता समिती’च्या कार्यालयात मंगळवारी सुमारे बारा सशस्त्र अतिरेकी घुसल़े त्या वेळी सैनिक झोपलेले होत़े त्यामुळे त्यांना अतिरेक्यांच्या आकस्मिक हल्ल्याला प्रत्युत्तर देता आले नाही़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा