भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मलकुमार आणि अमेरिकास्थित कन्या मोनासिंग यांनी आम आदमी पार्टीत (आप) प्रवेश केला आहे. मात्र मिल्खासिंग यांनी राजकारणापासून दूर राहणेच पसंत केल़े
निर्मलकुमार आणि मोना सिंग यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला असून आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, असे मिल्खासिंग यांनी म्हटले आहे. पक्षाचे लक्ष्य आणि उद्दिष्ट आणि अरविंद केजरीवाल यांचे काम यामुळे आपण प्रभावित झाल्याचे पत्नी आणि मुलीने सांगितले, असेही मिल्खासिंग म्हणाले. आपल्याला राजकारणात रस असता तर पं. जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच राजकारणात प्रवेश केला असता, असेही ते म्हणाल़े

Story img Loader