एआयएमआयएम अर्थात ऑल इडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंगळवारी तेलंगणातील संगारेड्डी भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपाचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला खुलं आव्हानही दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भाषणात ओवेसींनी बांदी संजय यांनी केलेल्या एका विधानाचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते बांदी संजय?

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, २०२०मध्ये बांदी संजय यांनी भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी मतदारांच्या मदतीने हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. “या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रोहिंग्या मतदारांशिवाय व्हायला हव्यात. आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर जुन्या शहरात आम्हा सर्जिकल स्ट्राईक करू”, असं बांदी संजय म्हणाले होते.

“भारताची नवी संसद सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी”, दिग्विजय सिंह आणि तृणमूलने पंतप्रधान मोदींना घेरलं

“काय बापाची जहागीर आहे का?” ओवेसींचा सवाल

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी त्या विधानाचा संदर्भ घेत बांदी संजय यांना मंगळवारी प्रत्युत्तर दिलं आहे. “हे वाट्टेल ते बोलत चाललेत. जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करणार म्हणे. बापाची जहागीर आहे का? हिंमत असेल तर करून दाखवा, या, बघू काय होतंय. सर्जिकल स्ट्राईक करणार म्हणे. आम्ही काय बांगड्या भरून बसलोय का? आमच्या घरातल्या महिला बांगड्या भरून जरी बसल्या असल्या, तरी त्या तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी खमक्या आहेत”, असं ओवेसी यावेळी म्हणाले.

“आरोपांमध्ये तथ्य असेल तर…”, पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीगीरांच्या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तुमच्यात हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा. बोल मोदींना की चीनला डेबसांग आणि डेमचांगवरून हाकलून लावा. २ हजार किलोमीटरचा भाग चीननं बळकावलाय. पण तिथे काही करत नाही, म्हणे आम्ही जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार”, असं आव्हान ओवेसींनी दिलं आहे.