सध्याच्या काळात आपण हरवणे कठीण आहे. अगदी कुंभमेळ्यातही हरवण्याची शक्यता फारच दुरावली आहे, याचे कारण म्हणजे जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीच्या मदतीने तुम्ही तुमचे स्थान समजावून घेऊ शकता किंवा तुम्ही हरवलात तर तुम्हाला शोधणे अवघड नसते. विश्वात आपले स्थान काय आहे हे माहीत नसले तरी जगात आपण कुठे आहोत हे अगदी घनदाट जंगलातून जात असतानाही समजते ते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममुळे. पण माणसाच्या मेंदूतही एक नैसर्गिक जीपीएस प्रणाली असते त्यामुळे आपल्याला आपण कुठे आहोत हे समजत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्रीड सेल्स
 प्रिन्स्टन विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या मते आपल्या मेंदूत स्थान शोधक न्यूरॉन्स असतात त्यांना ग्रीड सेल्स (संजाल पेशी) असे म्हणतात. आपण नेमके  कुठे आहोत याचे भान ठेवण्यासाठी आपल्याला या पेशी मदत करीत असतात. ग्रीड सेल्स म्हणजेच विशिष्ट प्रकारचे न्यूरॉन असतात. ते विद्युतीयदृष्टय़ा सक्रिय असतात. जेव्हा आपण आजूबाजूच्या स्थितीत वावरत असतो तेव्हा या ग्रीड सेल्स त्यांचे काम पार पाडीत असतात. इ.स. २००० च्या मध्यावधीत त्यांचा शोध लागला. जेव्हा आपण एखाद्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा या पेशी उद्दिपित होतात. नंतर त्या जागेचे चायनीज चेकर बोर्डसारखे षटकोनी पॅटर्न तयार केले जातात, त्यातून आपल्याला नेमके स्थान समजण्यास मदत होते

ख्रिस्तीना डॉमनीसोरू  यांचे संशोधन
संगणकनिर्मित आभासी परिस्थितीत वावरताना उंदराच्या मेंदूतील ग्रीड सेल्सचा अभ्यास करण्यात आला त्यात प्रत्येक ग्रीडमधील विद्युतीय संदेशांचे मापन करण्यात आले.उंदरांना ट्रीडमीलवर चालायला लावून त्यांच्या समोर व्हिडिओ स्क्रीन ठेवण्यात आला. त्यामुळे उंदीर जेव्हा षटकोनी ग्रीडच्या एका विशिष्ट बिंदूवर पोहोचत असत तेव्हा पेशीच्या आतील व बाहेरील भागाचे विभवांतर वाढत असे व तो जसा त्या बिंदूपासून दूर होत असे त्यावेळी ते कमी होत असे. या अ‍ॅट्रॅक्टर नेटवर्कचा शोध ३० वर्षांपूर्वी  प्रिन्स्टनचे प्राध्यापक जॉन हॉपफिल्ड यांनी लावला होता.

‘ या ग्रीड सेल्स म्हणजे अवकाशाचे प्रतिनिधीत्व असते. माणसाच्या चेतासंस्थेत एखाद्या ठिकाणाचे षटकोनी विभाजन करीत जे पॅटर्न तयार होतात त्यांचा अभ्यास आम्ही करीत आहोत.’
डेव्हीड टँक, प्रिन्स्टन विद्यापीठातील रेणवीय जीवशास्त्राचे हिलमन प्रोफेसर