दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेंद्रसिंग बिश्नोई असं मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते डीएसपी दर्जाचे पोलीस अधिकारी होते. ही घटना हरियाणातील नूह याठिकाणी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरवली पर्वत रांगेत पाचगाव येथे अवैध पद्धतीने दगडांचं उत्खनन केलं जात असल्याची गुप्त माहिती सुरेंद्रसिंग यांना मिळाली होती. त्यानुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास सुरेंद्रसिंग पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक ; आईच्या उपचाराच्या नावाखाली केली फसवणूक

यावेळी पोलिसांना पाहताच खाण माफियांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. तसेच काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सुरेंद्रसिंग यांनी रस्त्यात उभं राहून आरोपींना दगडांनी भरलेला ट्रक थांबवण्याचा इशारा दिला. पण आरोपींनी त्यांच्याच अंगावर ट्रक घातला. या धक्कादायक घटनेत सुरेंद्रसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नुहचे पोलीस अधीक्षक वरुण सिंघला पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mining mafia run stone loaded truck over dsp rank police officer during check haryana rmm