दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्ता आणि बदल्यांबाबतच राज्य सरकारच्या अधिकारांवर अंकुश आणणारे विधेयक सोमवारी रात्री मंजूर झाले. यावेळी सरकारमधील आणि विरोधातील खासदारांनी विधेयकाच्या चर्चेत सहभाग नोंदवला. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कवितेच्या माध्यमातून विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हे विधेयक चर्चेत होते. अनेक वाद-विवाद आणि चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने १३१, तर विरोधात १०२ मते पडली. यावेळी रामदास आठवले यांनी कविता म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. आणि विधेयकाला समर्थन दिलं.
हेही वाचा : VIDEO : संजय राऊतांचा राज्यसभेत थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल, अमित शाहांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “जरा…”
रामदास आठवले म्हणाले, “दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मग काँग्रेसवाले आम आदमी पक्षाला कशासाठी समर्थन देत आहेत? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं. त्यात अरविंद केजरीवाल होते, याचा आम्हाला आदर आहे.”
अमित भाईंका इतना अच्छा आ गया हे बिल,
लेकीन सामने वालों को हो रहा है फील.
नरेंद्र मोदीजीं के पास है, बहुत अच्छी वील,
लेकीन दिल्ली मे हो रही है, दारू के ठेके की डील.
नरेंद्र मोदी और अमित शाह की, अच्छ जम गई जोडी,
फिर काँग्रेस और आपवालों की, कैसे आगे जाएडी गाडी.
नरेंद्र मोदीजी जानते है, जनता की नाडी,
इसलिए बढाई है, मैंने अपनी दाढी.
दरम्यान, रामदास आठवलेंच्या या कवितेवर खासदारांसह गृहमंत्री अमित शाहा यांनाही हसू आवरेना.