अमेरिकेतल्या मिनेसोटा शहरात एक भीषण अपघात झाला झाला आहे. मित्राच्या लग्नाची तयारी करायला घराबाहेर पडलेल्या पाच तरुणींच्या कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात या पाचही तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या कारला एका मोठ्या एसयूव्हीने धडक दिली. स्थानिक प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. या तरुणी शुक्रवारी रात्री एका मॉलमधून लग्नाची खरेदी करून बाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या कारला एसयूव्हीने धडक दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साबिरीन अली (१७), सहारा गेसादे (२०), सलमा अब्दिकादिर (२०), सगल हर्सी (१९) आणि सिहम अॅडम (१९) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावं आहे. या तरुणी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी हातावर मेंदी काढून तयार होत्या. त्याचवेळी काही खरेदीसाठी बाहेर पडल्या. मॉलमधून खरेदी करून बाहेर पडल्या त्याची कार काहीच मिनिटं चालली असेल तोच त्यांच्या कारला एका एसयूव्हीने धडक दिली. यासंबधीचं स्टार ट्रिब्यूनने दिलं आहे.

यातल्या तीन बहिणी होत्या, तर इतर दोघी दूरच्या नातेवाईक होत्या. त्यातली एक मुलगी साबिरीन अली हीने नुकतंच शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. इतर मुली या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. या सर्व तरुणी मिनेसोटा येथे राहत होत्या. मिनेसोटा पश्चिम अमेरिकेतलं कॅनडाच्या सीमेजवळचं जवळचं राज्य आहे.

ज्या एसयूव्हीने या मुलींच्या कारला धडक दिली. ती कार ५५ मैल प्रति तास इतक्या वेगाने धावत होती. या भागात कारच्या वेगाची मर्यात ४० मैल प्रति तास इतकी निश्चित करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, हा अपघात इतका तीव्र होता की, एसयूव्हीच्या धडकेनंतर तरुणींची कार तब्बल ५० फूट दूर ढकलली गेली. हा अपघात खूप हृदयद्रावक आहे. शुक्रवारी रात्री महिला मॉलमधून शॉपिंग करून परतत असताना हा भीषण अपघात झाला.

दी स्टार ट्रिब्युनने दिलेल्या माहितीनुसार या एसयूव्हीच्या चालकाचं नाव डेरिक जॉन थॉम्पसन (२७) असं आहे. डेरिकदेखील या अपघातात जखमी झाला आहे. अपघातानंतर डेरिक कार तिथेच सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. डेरिक हा तिथले लोकप्रतिनिधी जॉन थॉम्पसन यांचा मुलगा आहे. जॉन यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. जखमी डेरिकला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याने ड्रग्ज किंवा मद्यप्राशन केलं होतं का याची चाचणी करण्यात आली.

हे ही वाचा >> मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “४० कोटींची फाईल…”

रॅश ड्रायव्हिंगमुळे डेरिकचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. मार्च २०२३ मध्ये वाहतूक विभागाने डेरिकला त्याचा परवाना परत केला होता. त्यानंतर तीनच महिन्यात त्याने हा अपघात केला आहे. दरम्यान, एका ऑनलाईन फंडरेजरने या अपघातातील पीडितेंच्या कुटुंबांसाठी ३ लाख डॉलर्सहून अधिक निधी उभा केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minnesota 5 women killed in horrific crash ahead of a friends wedding asc
Show comments