उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सहा पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या भयावह व्हिडीओमध्ये चार पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. तर पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी झटत आहेत. पीडितेनं आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला.

Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
British doctor who tried killing mother partner with fake COVID jab
बनावट कोव्हिड लस वापरून हत्येचा प्रयत्न; ब्रिटीश डॉक्टरने आईच्या साथीदाराला संपवण्याचा प्रयत्न का केला? नेमकं प्रकरण काय?
karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
Name Change After Marriage
लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
man attempted cyber fraud by pretending to be police in london
लंडनमधील पोलीस असल्याचे भासवून सायबर फसवणुकीचा प्रयत्न; ६० हजार रुपये गोठवण्यात पोलिसांना यश
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी एक आरोपी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करत होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक मदतीला धावून येतील या भीतीने सहाही आरोपींनी घटनास्थळावरून फरार झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.