एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचं गावातून अपहरण करून तिच्यावर दोन महिने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीनं पीडितेचं अपहरण केल्यानंतर तिला परराज्यात घेऊन गेला. येथे जवळपास दोन महिने आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय नराधमाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील एका गावातील आहे. येथील एका १७ वर्षीय मुलीचं १४ ऑगस्ट रोजी रात्री गावातून अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्याने तिला कर्नाटकात नेलं, येथे जवळपास दोन महिने तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अखेर पीडित मुलीची सुटका केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. तसेच आरोपीला मंगळवारी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

१४ ऑगस्ट रोजी रात्री गावातील एका २० वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीचं अपहरण केल्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणासह विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर मंगळवारी (१० ऑक्टोबर) पोलिसांनी बिल्थरा रोडवेज येथून मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली.

हेही वाचा – अविवाहित बहीण गर्भवती राहिल्याने राग अनावर, आईसह भावाने दिली भयंकर शिक्षा; जंगलात नेलं अन्…

यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीनं सांगितलं की, आरोपीनं तिचं गावातून अपहरण केलं आणि तिला कर्नाटकात नेलं. येथे जवळपास दोन महिने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी संबंधित प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यातील तरतुदी जोडल्या, याबाबतची माहिती पोलीस अधिकारी राजीव मिश्रा यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl abduction from village raped for two months in karnataka accused arrested crime in uttar pradesh rmm