एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या संचालकाच्या मुलाने दोन वर्षे बलात्कार केला. मी त्यावेळी सहावीत होते, २०१७ मध्ये ही घटना घडल्याचं एका अल्पवयीन मुलीने म्हटलं आहे. ही मुलगी आता सतरा वर्षांची आहे. आमच्या शाळेच्या संचलकांच्या मुलानेच माझ्यावर बलात्कार केला, असं म्हणत अल्पवयीन मुलीने आपबिती सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय सांगितलं आहे या पीडितेने?

पीडितेने सांगितलं की, २०१७ मध्ये मी सहावीत होते. त्यावेळी माझी फी भरणं बाकी होतं म्हणून मला आमच्या शाळेच्या मुख्याध्याकांनी बोलवून घेतलं. त्यांनी मला सांगितलं माझ्या बरोबर चल. मी आमच्या मुख्याध्यापिका मॅडमसह चालत गेले. त्यांनी मला आमच्या शाळेच्या वाचनालयात नेलं. तिथे एक छोटीशी खोली होती. मॅडमनी मला त्या खोलीत जायला सांगितलं. मी आतमध्ये गेल्यावर मॅडमनी त्या खोलीला बाहेरुन कडी लावून घेतली. मी घाबरुन गेले होते. तेव्हाच मला हे लक्षात आलं की त्या खोलीत मी एकटी नव्हते. तिथे आमच्या शाळेच्या संचालकांचा मुलगा होता. तो माझ्या जवळ आला, त्याने माझे केस ओढले आणि माझ्यावर बलात्कार केला. तसंच त्याने या सगळ्याचं शूटिंग केलं. माझ्यावर अत्याचार होत होता, माझ्या शर्टची बटणंही तुटून गेली. बिहारच्या शारसा जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे.

मुख्याध्यापिकेने मलाच थोबाडीत ठेवून दिली.

माझ्याबाबतीत जो प्रसंग घडला त्यानंतर मी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम दरवाजाबाहेरच होत्या. त्यांनी दरवाजा उघडला, त्यानंतर मला थोबाडीत ठेवून दिली आणि मला माझे कपडे आणि केस व्यवस्थित करायला सांगितले. त्यांनी मला सांगितलं की आत्ता जे घडलं ते वर्गात कुणाला बोललीस तर याद राख. असं म्हणत या मुलीने तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची माहिती हिंदुस्थान टाइम्सला दिली.

दोन वर्षात वारंवार बलात्कार

माझ्याबाबतीत जे काही घडलं त्यामुळे मी इतकी घाबरले होते की मी ते कुणालाही सांगू शकले नाही. त्यानंतर मी काहीतरी कारणं काढून शाळेत गेले नाही. मात्र जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा पुन्हा माझ्यावर बलात्कार झाला. मला तेव्हा मुख्याधापिकेने सांगितलं की तू काय सांगशील तुझ्या आई-वडिलांना आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतील का? यानंतर मला त्या पुन्हा वाचनालयात घेऊन गेल्या. तिथे पुन्हा तेच सगळं माझ्यासह घडलं. दोन वर्षे माझ्यावर अनेकवेळा बलात्कार झाला. शाळेच्या संचालकाच्या मुलानेच माझ्यावर दोन वर्षांमध्ये वारंवार बलात्कार केला. एवढंच नाही तर मला प्रत्येक वेळी ही धमकी दिली जायची की तुझ्यावर जितक्यांदा बलात्कार करण्यात आलाय त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. जर तू याविषयी कुणाला काही बोललीस तर आम्ही ते व्हिडीओ व्हायरल करु. मी त्यानंतर कशीबशी आई वडिलांची समजूत घातली आणि त्यांनी मला त्या शाळेतून काढून मुलींच्या शाळेत घातलं. त्यानंतर माझ्यावरचे अत्याचार संपले. पण मी त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही असं या मुलीने सांगितलं.

प्रकरण बाहेर आलं आणि पोलिसांनी केली आरोपीला अटक

मला डॉक्टर व्हायचं आहे, मात्र अजूनही माझ्या मनातून आणि डोक्यातून त्या मुलाचा आवाज, त्याचं हसणं, त्याचा स्पर्श काहीही गेलेलं नाही. मी शारसा या ठिकाणी आले त्याआधी जेव्हा पाटणा येथील वसतिगृहात होते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटायचं आणि त्यातून चक्करही यायची. माझ्या मैत्रिणी मला कायम विचारत असत की नेमकं काय घडलंय ज्यामुळे तू इतकी अस्वस्थ होतेस? त्यावर मी शांत रहायचे पण अखेर एक दिवस एका मैत्रिणीला मी काय घडलं ते सांगितलंच. त्यानंतर हे सगळं तिने आई वडिलांनाही सांगितलं. आता आरोपी विरोधात गुन्हा दाखकरण्यात आला आहे. या मुलीच्या भावाने आणि आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर त्या शाळेच्या संचालकांचा मुलगा आणि मुख्याध्यापिका या दोघांना अटक करण्यात आली आहे.