शाळेतील शिक्षकानेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने मंगळवारी बंगळुरूमध्ये हिंसाचार उसळला. नराधम शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आग्रही मागणी संतप्त निदर्शकांनी केल्याने जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडाव्या लागल्या.शाळेबाहेर जमलेल्या संतप्त निदर्शकांनी हिंसक वळण घेत दगडफेक करून अनेक दुचाकींना आगी लावल्या. सदर शिक्षकाला तेथून घेऊन जाताना जमावाने मारहाण केली, त्यावेळी झालेल्या झटापटीत काही पोलीस जखमी झाले.सदर शिक्षकाचे नाव रामकृष्ण असे असून तो शारीरिक शिक्षणाचे धडे देतो. सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर त्याने शाळेतच लैंगिक अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा