मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं होतं. यानंतर पीडित मुलीने मदतीसाठी तब्बल ८ किलोमीटर पायी प्रवास केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बलात्कार प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी भरत सोनी नावाच्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. तसेच अन्य तिघांना ताब्यात घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अटकेनंतर आरोपी भरत सोनीचे वडील राजू सोनी यांनी ‘इंडिया टुडे’ला प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घृणास्पद कृत्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडितेच्या जागी माझी मुलगी असती, तर मीही तेच बोललो असतो. असे गुन्हे करणारे जगण्याच्या लायकीचे नाहीत. मग तो माझा मुलगा असो वा इतर कुणाचाही, असा गुन्हा करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना फाशी किंवा गोळी मारली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजू सोनी यांनी दिली.

हेही वाचा- संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागितली मदत पण…

राजू सोनी यांनी पुढे सांगितलं, “उज्जैन येथील घटनेबद्दल मी बातम्यांमधून ऐकलं होतं. काल पोलिसांनी माझ्या मुलाला अटक केली. तत्पूर्वी मी माझ्या मुलाशी(भरत सोनी) या घटनेबद्दल बोललो होतो. पण तो बेफिकीर दिसत होता. त्याच्या दैनंदिन जीवनात जणू काहीच घडलं नाही, असं तो वागत होता. त्यानेच मला विचारलं, हे कुठे घडले? त्यावर मी म्हणालो, उज्जैनमध्ये”

हेही वाचा- अविवाहित बहीण गर्भवती राहिल्याने राग अनावर, आईसह भावाने दिली भयंकर शिक्षा; जंगलात नेलं अन्…

“आता पोलिसांनी त्याला आरोपी बनवलं आहे, पण सत्य नंतर बाहेर येईलच. तो माझा मुलगा आहे, त्यामुळे मी त्याला साथ देईन. पण कुणाच्या मनात काय सुरू आहे, याला आपण नियंत्रित करू शकत नाही. त्याने हे कृत्य केलं नसेल, असं मला वाटतंय. परंतु जर त्याने हे केलं असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी त्यांना गोळ्या घालायला हव्यात,” असंही राजू सोनी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl raped in ujjain leave on road half naked and bleeding accused father demand death penalty crime in madhya pradesh rmm