जय श्रीराम चे नारे दिल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांनी मारहाण केली. ही घटना ग्रेटर नोएडा या ठिकाणी एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की पीटी शिक्षकांनी आमच्या मुलाला जय श्रीरामचे नारे दिल्याने मारहाण केली. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा संचालकांकडे दाद मागायला गेलो तेव्हा त्यांनी तुमच्या मुलाचं नाव महाविद्यालयातून काढून टाकू अशी धमकीही आम्हाला दिली असाही आरोप सदर मुलाच्या पालकांनी केला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेत स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ११ वीत शिकणाऱ्या मुलाने जय श्रीरामचे नारे दिले. त्यानंतर शिक्षकांनी त्याला मारहाण केली. सुरुवातीला शिक्षक वर्गात आले त्यांनी या मुलाचं नाव काय आहे ते विचारलं आणि त्यानंतर १५ मिनिटं त्याला बेदम मारहाण केली असा आरोप आहे. या मुलाचे काका त्याला घ्यायला आले होते. त्यावेळी त्याला मारहाण झालेली पाहून त्यांनी कारण विचारलं, त्यावेळी या मुलाने सगळी माहिती दिली.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

या संपूर्ण घटनेविषयी शाळा प्रशासनानेही भाष्य केलं आहे. जे आरोप लावण्यात आले आहेत ते निराधार आहेत असं शाळा प्रशासानाने म्हटलं आहे. त्या दिवशीच्या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. शाळेची शिस्त विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनीही मोडली आहे. मात्र आम्ही अद्याप मुलाला शाळेतून काढलेलं नाही. तसंच जे शिक्षक या प्रकरणात आहेत त्यांनी या विद्यार्थ्याला शिकवण्यास नकार दिला आहे. मात्र मारहाणीचे आरोप निराधार आहेत असं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.