छत्तीसगड जिल्ह्यातील बीजापूर येथील दोन अल्पवयीन मुंलींवर माओवाद्यांनी केलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील संबंधीत पीडीत मुलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन अल्पवयीन मुली अनुक्रमे ११ व १२ वर्षांच्या असून सी.आर.पी.एफ.च्या जवानांना शोध मोहिमेदरम्यान सापडल्या होत्या. मंगळवारी गृहमंत्रालयाकडून या मुलींना व कुटूंबाच्या पुर्नवसनासाठी प्रत्येकी पाच लाखांची मदत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या गावातून नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते, असे सी.आर.पी.एफ.च्या सैनिकांनी स्पष्ट केले आहे. तीन नक्षलवाद्यांनी या मुलींचा छळ करून त्यांच्यावर काही महिने बलात्कार करत होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना जंगलात सोडून दिले, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी बलात्कार केलेल्या पीडित मुलींना प्रत्येकी पाच लाखांची मदत
छत्तीसगड जिल्ह्यातील बीजापूर येथील दोन अल्पवयीन मुंलींवर माओवाद्यांनी केलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील संबंधीत पीडीत मुलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
First published on: 07-11-2012 at 02:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minors raped by naxals to get rs 5 lakh each