Turkey Syria Earthquake 2023: टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठा प्रलय माजला. दोन्ही देशांमध्ये मिळून २८ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. दोन्ही देशामध्ये बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाने मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविल्यामुळे भूकंपाचा विनाश काही थांबताना दिसत नाही. मात्र या दरम्यान संपूर्ण जगाला अचंबित करणारी एक घटना घडली. टर्कीच्या हेते प्रॉविन्स येथे एका घराच्या ढिगाऱ्याखालून एक नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १२८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले. या बाळाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर लोक या घटनेला चमत्कार असल्याचे म्हणत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा