केरळमधील पलक्कड येथून ११ वर्षांपूर्वी १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. तपास करून हैराण झालेल्या नातेवाईकांनी अखेर मुलगी परत मिळण्याची आशा सोडली. मात्र असा अंदाज लावणाऱ्या सगळ्यांना बेपत्ता मुलीने आश्चर्याचा धक्का दिला. मुलगी सजिथा बेपत्ता नव्हती तीच्या घरापासून ५०० मीटर प्रियकर रहमान सोबत राहत होती. रहमानच्या घरच्यांना सुद्धा याची अजिबात माहिती नव्हती. जेव्हा या दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुलगी १८ तर मुलगा २४ वर्षांचा होता. आज जेव्हा दोघे सापडले. तर मुलगी २९ वर्षांची आहे आणि मुलगा ३४ वर्षांचा आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की. त्यांनी आपल्या मुलीला भेटण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती. मुलीचा ३४ वर्षीय प्रियकरही बेपत्ता झाल्यावर या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली. तेव्हा हे अनोखे प्रेम प्रकरण उघड झाले. मुलगीही प्रियकरासोबत निघून गेली होती. मार्च २०२१ मध्ये रहमान बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात नोंदवली होती. घरी न सांगता तो बेपत्ता झाला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. एके दिवशी त्याच्या भावाने अचानक रहमानला रस्त्यावर पाहिले पण तो घरी येण्यास तयार नव्हता. लॉकडाउनमुळे पोलीस तपास सुरु होता. रेहमानच्या भावाने त्याच्याबद्दल पोलिसांना सांगितले आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
रहमानवर कोणालाही संशय नव्हता
यानंतर रहमानने पोलिसांना संपूर्ण कथा सांगितली. रहमानच्या म्हणण्यानुसार तो भाड्याच्या घरात राहत आहे. सजिता सुद्धा त्याच्यासोबत राहत आहे. २०१० नंतर काय घडले तेही रहमान यांनी पोलिसांना सांगितले. ११ वर्षांपूर्वी घर सोडल्यानंतर सजीथा रेहमानच्या घरी थांबण्यासाठी आली होती. तेव्हापासून हे दोघेही घरातील सदस्यांना न सांगता रहमानच्या खोलीत राहू लागले.
यावेळी पोलिसांनी सजिताची देखील चौकशी केली. तर ती म्हणाली “रेहमानच्या घरी त्याच्या आई-वडिलांसह इतर चार लोकं राहत होते. जर कोणी रहमानच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तो आक्रमक होत असे. बर्याचवेळा तो कामावर जात नव्हता आणि खोलीतच जेवण करत होता. इतकी वर्षे असेच चालले.”
अशाप्रकारे लपून थकला होता रहमान
आश्चर्य म्हणजे रहमानच्या खोलीत शौचालय-स्नानगृह सुद्धा नव्हते, अशा परिस्थितीत जेव्हा घरातील सर्व सदस्य रात्री झोपायचे तेव्हा सजिथा खिडकीवाटे खोलीच्या बाहेर येत असे. यासाठी खिडकीच्या ग्रील काढून टाकल्या होत्या. रहमानने पोलिसांना सांगितले की, तो अशाप्रकारे लपून थकला होता. त्यामुळे यावर्षी मार्चमध्ये दोघेही घराबाहेर आले आणि भाड्याने खोली घेऊन राहू लागले.
हेही वाचा – म्यानमारहून भारतात पायी चालत आल्या होत्या हेलन; ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता खुलासा
या दोघांचीही चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे म्हणणे विश्वासार्ह मानले. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने सजिथाला रहमानबरोबर राहण्याची परवानगी दिली. आता दोघेही त्यांच्या भाड्याच्या खोलीत राहत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मुलगी जेव्हा बेपत्ता झाली तेव्हा ती १८ वर्षाची होती. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलीसांनी तपास केला होता. पोलीस म्हणाले, तीच्या प्रियकराचे घर तिच्या पालकांच्या घराजवळ होते. ती मार्च २०२१ पर्यंत प्रियकरासोबत राहत होती. प्रियकर रहमान तीची देखरेख करत असे.