Karnataka Women Found In Himachal After 25 Years : कर्नाटकातून हरवलेली ५० वर्षीय महिला तब्बल २५ वर्षांनंतर हिमाचल प्रदेशातील मंडी येथे सापडली आहे. २५ वर्षांपूर्वी एका लग्नाला गेल्यावर ही महिला चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याने आधी पंजाबमध्ये पोहचली होती. त्यानंतर उत्तरेकडी विविध राज्यात फिरून ती हिमाचल प्रदेशातील एका अनाथाश्रमात राहू लागली होती. दरम्यान ही महिला आता कर्नाटकातील तिच्या घरी परतली आहे.

२५ वर्षांपूर्वी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील दाननायकनहल्ली गावाच्या असलेल्या सकम्मा आपल्या मुलांसह होसापेटे येथे एका नातेवाईकाच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्नानंतर त्या चुकून चंदीगडला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या आणि पंजाबमध्ये पोहचल्या. त्यानंतर काही वर्षे त्या उत्तरेकडील अनेक राज्यात फिरल्या व शेवटी हिमाचल प्रदेशातील मंडीत एका अनाथाश्रमात राहू लागल्या.

Mahakumbh
Mahakumbh Stampede : ‘महाकुंभमेळ्याला येऊ नका…’, चेंगराचेंगरीत मृत्यू होण्याच्या काही तासापूर्वीच कर्नाटकातील महिलेने लोकांना केलं होतं आवाहन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
Ghatkopar West, two were attacked , bamboo ,
मुंबई : किरकोळ वादातून बांबूने मारहाण करून खून, एक जखमी
On tuesday morning police found dead body of woman at Dream Mall on lbs road in Bhandup West
भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
ambulance
शेवटी मृत्यूने गाठलेच! महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पण रुग्णवाहिकेतील ‘या’ चुकीमुळे गेला जीव
woman deadbody, hotel , Marine Drive ,
मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला

कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार

सकम्मा यांच्या कुटुंबीयांनी अनेक दिवस शोध घेतल्यानंतर हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. सकम्मा हरवल्यानंतर पोलिसांना त्या परिसरात एक मृतदेह आढळला होता. तो सकम्मा यांचाच आहे असे समजून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले होते.

हे ही वाचा : दिल्लीत लाडक्या बहिणीला निधी मिळणार की नाही? ‘महिला सन्मान योजना’ वादात; महिला कल्याण विभागानंच नाकारली घोषणा!

कसा लागला सकम्मांचा शोध?

दरम्यान नुकतेच मूळचे कर्नाटकातील असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याने मंडीतील अनाथाश्रमाला भेट दिली होती. त्यावेळी सकम्मा कन्नडमध्ये बोलत असल्याचे या अधिकार्‍याच्या लक्षात आले. त्यानंतर या अधिकाऱ्याने सकम्मा यांच्याकडे आणखी चौकशी केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. या अधिकार्‍याने यावेळी सकम्मा यांचा व्हिडिओ बंगळुरूमधील त्यांच्या सहकाऱ्याला पाठवला होता. त्याने तो एक्सवर पोस्ट केल्यानंतर कर्नाटक समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव पी मनिवन्नन यांनी मंडी जिल्ह्याचे पोलीस आयुक्त रवीनंदन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सकम्मा यांच्या परतीची व्यवस्था करण्यात आली.

हरपनहल्ली गावच्या स्थानिक अधिकार्‍यांसह कर्नाटक समाज कल्याण विभागाचे अधिकारी मंडीला गेले होते. त्यांना सकम्मा यांना भांगरोट अनाथाश्रमातून विमानाने चंदीगडला आणि पुढे बेंगळुरूला आणले.

हे ही वाचा : कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?

काय म्हणाले सकम्मा यांचे कुटुंबीय

सकम्मा यांचा शोध लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई बेपत्ता झाली होती. आता ती सापडली आहे, आम्ही खूप आनंदी आहोत,” अशा भावना सकम्मा यांच्या मुलाने व्यक्त केल्या आहेत. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

Story img Loader