नववर्षांच्या पूर्वसंध्येस बेपत्ता झालेला ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थी सौविक पाल मँचेस्टर युनायटेड क्लबच्या मैदानानजीक असलेल्या ओढय़ात मृतावस्थेत आढळला. मात्र, त्याच्या शवविच्छेदनावरून कोणतेही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. १८ वर्षीय सौविक नववर्षांच्या पूर्वसंध्येस मित्रांशी खेळत असताना बेपत्ता झाला होता. बरीच शोधाशोध करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. मंगळवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता, सौविक याचा मृतदेह ब्रिजवॉटर कॅनालजवळ आढळला. सौविक याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी सखोल तपास आणि चौकशी सुरू असल्याची माहिती मँचेस्टर पोलिसांनी दिली.

Story img Loader