गेल्या शुक्रवारी, ८ मार्चपासून बेपत्ता असलेल्या या विमानाचा शोध सुरू आहे. विमानाच्या बेपत्ता होण्यामागील कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. त्यातच आता हे विमान तालिबान्यांचे नियंत्रण असलेल्या दक्षिण अफगाणिस्तानातील अतिदुर्गम भागात नेण्यात आले असावे, असाही कयास व्यक्त होत आहे. मात्र, या दोन्ही भागांवर कोणाचेही सरकारी नियंत्रण नसल्याने तेथे शोध घेण्यासाठी अफगाणिस्तान व पाकिस्तानी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमएच३७०च्या  शोधाची व्याप्ती वाढली
मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता झालेले विमान रडारला टाळण्यासाठी ५ हजार फूट किंवा त्यापेक्षाही खालच्या उंचीवर आणण्यात आले होते व त्यानंतर ते हवेतच माघारी फिरून वळवण्यात आले, असे मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे विमान हेतुपुरस्सर बेपत्ता केले गेले किंवा त्याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. ‘ऑल राईट गुड नाइट’ असे शेवटचे शब्द होते व ते सह वैमानिकाने उच्चारले होते, त्यानंतर संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असे आता निष्पन्न झाले आहे. या विमानाचा शोध ११ देशांच्या सागरी सीमेत घेण्यात येत आहे.
हे विमान आठ तास रडार क्षेत्राच्या बाहेर होते. तीन देशांतील रडार्सना चुकवून ते उडत होते. कमी उंचीवरून विमान उडत असेल तर ते रडारवर दिसत नाही, त्याला टेरेन मास्किंग म्हणतात, तसा प्रकार या विमानाच्या बाबतीत करण्यात आला असावा. वैमानिकाला हवाइ्र वाहतुकीचे उत्तम ज्ञान होते, असे ‘न्यू स्ट्रेट्स टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missing malaysian airlines plane could have flown into taliban controlled pakistan