राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत लालू यांनी राहुल यांच्यासोबत आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आघाडी करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच लालू यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर २००९ मध्ये आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मान्य करीत  बिहार, झारखंड आणि इतर राज्यांमध्येही धार्मिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यास आपण उत्सुक असल्याचे लालू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बुधवारी लालू यांनी राहुल यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत तसेच आगामी निवडणुकीत आघाडी करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. मात्र या बैठकीबाबत अधिक माहिती उपलब्ध उपलब्ध होऊ शकली नाही. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लालू जानेवारीच्या अखेरीस सोनिया गांधी यांना भेटणार आहेत.

Story img Loader