Mississippi Shooting at School Premises : अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात खळबळजनक घटना घडली आहे. मध्य मिसिसिपीमध्ये दोन बंदूकधारी इसमांनी जमावावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की फुटबॉलच्या सामन्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आहे. सामना संपल्यानंतर बरेच जण मैदानावर जल्लोष करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. मिसिसिपीमधील ले क्सगटपासून तीन किमी दूर होम्स काउंटी कन्सोलिडेटेड स्कूलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे.
होम्स काउंटीचे शेरिफ विली मार्च या घटनेची माहिती देताना म्हणाले, कार्यक्रमादरम्यान काही लोकांमध्ये मोठं भांडण झालं होतं. त्या भांडणातूनच ही गोळीबाराची घटना घडली आहे. मात्र, हे भांडण नेमकं कशामुळे झालं होतं ते आम्हाला समजलेलं नाही. २०० ते ३०० जण मैदानात जल्लोष करत होते. त्याचवेळी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर सर्वजण सैरावैरा धावू लागले. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोघेजण १९ वर्षांचे होते. तर तिसऱ्या मृत व्यक्तीचं वय २५ वर्षे इतकं होतं. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आम्ही या घटनेची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच पोलीस तपास चालू आहे.
जॉर्जियातील शाळेत गोळीबार, चार जणांचा जागीच मृत्यू
याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये जॉर्जियामधील एका हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून चार जणांचा जीव घेतला होता. सकाळी ९.३० च्या सुमारास जॉर्जियाच्या विंडरमध्ये अपालाची हायस्कूलमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं की देशातील हिंसाचाराच्या या वाढत्या घटना समाजात दुही निर्माण करत आहेत. बायडेन यांनी यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहत म्हटलं होतं की जॉर्जिया शहरात किंवा अमेरिकेत कुठेही पुन्हा अशा घटना घडता कामा नयेत.
हे ही वाचा >> Video: “मी त्याच्याकडे पाहिलं..एक लहान, विचित्र आणि…”, याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायली अधिकाऱ्यानं शेअर केला तो प्रसंग!
अलबामामध्येही सारखीच घटना
सप्टेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील बर्मिंघममधील अलबामा येथे अशीच एक गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हादेखील हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला होता, ज्यामध्ये चार जण ठार झाले होते. शहरातील फाइव्ह पॉइंट्स साउथ भागात ही घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या.