अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झालेल्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मिट रोम्नी यांनी खुल्या मनाने ओबामा यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या हजारो समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.
या विजयाबद्दल मी ओबामा यांचे नुकतेच दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्यांच्या पत्नीचे, मुलींचे आणि त्यांच्या समर्थकांचेही मी अभिनंदन केले. सध्या आपल्या देशासमोर मोठी आव्हाने असल्याने राजकीय विरोध करण्याची ही वेळ नाही. आपली अर्थव्यवस्था नव्याने भरारी घेईल तसेच आपल्या देशाला योग्य दिशा दाखवण्यात ओबामा यशस्वी होतील, अशी आशा मी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
यशस्वी उद्योजक असणाऱ्या ६५ वर्षीय रोम्नी यांना या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यांचे समर्थकही त्यांच्याच विजयाची आशा बाळगून होते. या साऱ्याचा त्यांनी या भाषणात उल्लेख केला. आपण सर्वानी जीव तोडून प्रचार केला, ठिकठिकाणी चांगले समर्थन लाभल्याने तुम्हा सर्वाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळेल, असे वाटले होते. मात्र बहुसंख्य मतदारांनी ओबामा यांच्यावर विश्वास प्रदर्शित केल्याने आता आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि अमेरिकेला अधिक बळकट करण्यासाठी त्यांना सहकार्य करू, असे ते म्हणाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा