कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कौटुंबिक राजकारणास संमिश्र फळे आली असून तसे प्रतिबिंब निकालामध्ये उमटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे शमनूर शिवशंकरप्पा आणि त्यांचे चिरंजीव एस. एस. मल्लिकार्जुन तसेच एम. कृष्णप्पा आणि त्यांचे चिरंजीव प्रिय कृष्णा हे आपापल्या मतदारसंघांमधून विजयी झाले आहेत. शिवशंकरप्पा हे दावणगिरी (दक्षिण) तर मल्लिकार्जुन हे दावणगिरी (उत्तर) मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. कृष्णप्पा यांनी बंगळुरू शहरातील आपला विजयनगर मतदारसंघ कायम ठेवला असून त्यांचे चिरंजीव प्रिय कृष्णा हे शेजारच्या गोविंदनगर मतदारसंघातून विजयी झाले.

जनता दल (सेक्युलर) पक्षाला संमिश्र यश मिळाले आहे. पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डी. कुमारस्वामी हे रामनगर मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले असतानाच त्यांच्या पत्नी अनिता यांना चेन्नपटणा मतदारसंघात विरोधी उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. कुमारस्वामी यांचे ज्येष्ठ बंधू एच. डी. रेवण्णा यांना हसन जिल्ह्य़ातील होळेनरसीपुरा मतदारसंघातून नेत्रदीपक यश मिळाले आहे.

भाजपचे एम. कृष्णप्पा यांनी बंगळुरू (दक्षिण) मतदारसंघ कायम राखण्यात यश मिळविले, मात्र त्यांचे बंधू एम. श्रीनिवास हे राजराजेश्वरनगर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. तेही भाजपचेच उमेदवार होते. याखेरीज माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे दोन्ही चिरंजीव शिमोगातील सोराबा मतदारसंघात परस्परांविरोधात ठाकले होते. त्यांच्यापैकी मधू बंगारप्पा (जनता दल सेक्युलर) यांनी कुमार बंगारप्पा (काँग्रेस) यांना पराभवाची धूळ चारली.